ज्या खतात ज़ीरो नाइट्रोजन आहे, तेच आपल्या शेतकऱ्याना प्रिय झाले आहे. मार्केटमधे त्याचीच मागणी उदंड झाली आहे. भाजीपाला पिके, फळझाडे यासाठी मोठ्या प्रमाणात ज़ीरो नायट्रोजन खते वापरली जात आहेत. नायट्रोजन अन्नद्रव्य खतात असेल तर किड रोग वाढतात असा संभ्रम असल्याने नकोच तो नायट्रोजन असे काही शेतकरी छातीठोक सांगतात, खास करून डाळिंब बागायतदार.
ज़ीरो नायट्रोजन ही संकल्पना अर्धवट शास्त्रीय आहे. परंतु ती फोफावण्याचे कारण आहे ते इस्रायल! इस्रायली खत कंपनी ही ज़ीरो नायट्रोजनवाली आणि अधिक फॉस्फरस असलेली खत मोठ्या प्रमाणात भारतात आणते.. त्या खतांचा लगेचच प्रसार झाला.
ते खत प्रमाणाबाहेर वापरणे अयोग्यच आहे. अन्नद्रव्ये असमतोलास कारणीभूत ठरणारी आहेत तसेच उत्पादकात फारशी न वाढविणारी आहेत. नायट्रोजन फोबियामुळे फॉस्फरसचे व्यसन लागले आहे, शेतकऱ्याना. ज़ीरो नायट्रोजन म्हणजे अतिरिक्त फॉस्फरस अशी परस्थिती निर्माण झाली आहे. पण वाहत्या गंगेत हात धुवून घ्या,म्हणून आमच्या विगर कंपनीने इंग्लंड वरून ज़ीरो नायट्रोजन खत आणले. ते प्रचंड हिट झाले. त्याचे शॉर्टेज झाले.
पण ज़ीरो नायट्रोजन क्रेझ ही शेतीला धोकादायकच. त्यातील अतिरिक्त फॉस्फरस तर सायलेंट किलरच. मग त्याला तोडगा म्हणून आम्ही IPE टेक्नोलॉजीची खते उपलब्ध करून देत आहोत. त्यात अन्न्द्रवे संतुलन सोबतच उच्च कार्यक्षमता असेल. किडरोग वाढण्याची भीती नसेल. गेली एक वर्षे प्रायोगिक तत्त्वावर IPE खते शेतकऱ्यांना दिली. ती खूपच यशस्वी झालीत. IPE तंत्रज्ञान चे अनुभव देवाण घेवाणसाठी, नुकतेच नाशिक येथे कृषी सेवा केंद्र संचालक यांची मीटिंग झाली. सर्वांचा उत्साह पाहता संतुलित अन्नद्रव्येसाठी IPE खते ही ज़ीरो ची क्रेझ संपवणार यात शंका वाटत नाही.


